नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:42 PM2021-06-20T16:42:52+5:302021-06-20T16:44:30+5:30

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले.

Efforts are needed to make Nashik a commercial hub | नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज

नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांचे मत

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले.
"लोकमत"च्या नाशिक आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या अनुषंगाने शहरातील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी आयोजित चर्चेत साखला फर्निचर मॉलचे संचालक नंदकिशोर साखला, आर्टलाइन फर्निचरचे संचालक प्रेम नंदवाणी, पारख अप्लायन्सचे संचालक रवी पारख, फर्निचर किंगचे संचालक शंकर अग्रवाल, इंट्रो फर्निचरचे संचालक शिरीष वाबळे, डिझायर सोफा मॉलचे संचालक केजेश सत्रा व आर्टलाइन फॅशनचे संचालक महेंद्र नंदवाणी सहभागी झाले होते. ह्यलोकमतह्णचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत करून चर्चेत भाग घेतला.
कोरोनाने लॉकडाऊन काळात प्रत्येकाला घरात सक्तीने बंदिस्त केल्यामुळे लोकांचा स्वत:कडे, तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक स्मार्ट होत चालले असून, ज्यांना खरोखर काही खरेदी करायचे तेच घराबाहेर पडत आहेत. ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करता मुंबई, पुण्यात मिळणाऱ्या वस्तू नाशिकमध्ये कशा उपलब्ध होतील यावर विचार करणे आवश्यक असल्याचा सूरही या चर्चेत उमटला. यावेळी ऑनलाइन मार्केटिंग तसेच भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या वस्तूंच्या उपलब्धतेबाबतही चर्चा करण्यात आली.

स्पर्धेसोबत उलाढालही वाढली
पूर्वी दुकानांची संख्या मर्यादित होती. अल्प विक्रीत विक्रेता आणि ग्राहकही खुश होते. विक्रेता जी वस्तू दाखवायचा व सुचवायचा त्यावर विश्वास ठेवून ग्राहक खरेदी करायचे. आता वस्तूंमध्ये आलेल्या नावीन्यामुळे आणि अर्थपुरवठा करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने ग्राहक जागरूक झालेला असून, त्याची अभिरुचीही बदललेली आहे. त्यामुळे ग्राहक मागेल ते आता पुरवावे लागते. प्रारंभी नानाविध फर्निचर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे या गोष्टी फक्त श्रीमंतांच्या असतात असा समज होता. आता त्या सर्वांसाठी दैनंदिन गरजेच्या भाग बनल्या आहेत. त्यामुळे व्यवसायामध्ये स्पर्धा वाढलेली असली तरी त्या तुलनेने उलाढालही वाढल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.
 
Web Title: Efforts are needed to make Nashik a commercial hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.