येवला तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात
By Admin | Updated: December 26, 2016 01:54 IST2016-12-26T01:54:11+5:302016-12-26T01:54:29+5:30
येवला तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

येवला तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात
येवला : येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी आपले हित जोपासावे. ग्राहक देवो भव असे ग्राहक पंचायतीचे सूत्र असून, संस्थापक बिंदूमाधव जोशी यांचे विचार जोपासावे असे प्रतिपादन तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी केले. येथील तहसिल कार्यालयात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्र मात ते बोलत होते.
याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे प्रभाकर झळके, दीपक पाटोदकर, हरीश पटेल यांनी मनोगतातून ग्राहकांचे हक्क, अधिकार याविषयी माहिती दिली. यावेळी स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे विद्यार्थी राहुल पाटोळे व तुषार येवले यांनी ग्राहक गीत सादर केले. सौरभ मगर, आदित्य बोंदार्डे, विशाल वाघ, अथर्व जाधव, संकेत नवले, नितेश परदेशी, सौरभ देशमुख यांनी जागो ग्राहक जागो हे समुहगीत सादर केले. कार्यक्र मात वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत व पारितोषीक प्राप्त रोहित वखारे आणि पार्थ सावरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. निबंध लेखन स्पर्धेतील ऋ षिकेश थोरात, ओंकार नागरे, सिद्धी थोरात यांना तहसीलदार बहिरम व प्रभाकर झळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन पुरवठा विभागाचे बाळासाहेब हावळे, योगेश पाटील, पुष्कराज केवारे यांच्यासह पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी केले. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भंडारी, स्वस्त धान्य दुकान संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबुलाल कासलीवाल, दगु साठे, जगदीश काबरा यांचेसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, व्यापारी, शासकीय विभागांचे विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित
होते. (वार्ताहर)