दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:22 IST2019-02-12T17:22:05+5:302019-02-12T17:22:30+5:30
सिन्नर : तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले. तालुक्यात दुष्काळी ...

दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
ठळक मुद्दे सिन्नर : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे तहसीलदारांना निवेदन
सिन्नर : तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले.
तालुक्यात दुष्काळी योजनांची उपाययोजना केवळ कागदावरच सुरू असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. २०१६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता तयार करण्यात आली. परंतु या संहितेची मराठी आवृत्ती अद्याप कोठेही उपलब्ध नाही. महाराष्टÑात कायद्याची भाषा ही मराठी असून, शासन निर्णयााप्रमाणे सर्व कामकाज मराठी भाषेत व्हावे असे अपेक्षित असताना इंग्रजी भाषेचा वापर करणे चुकीचे असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.