शिक्षण हक्क; आज सोडत

By Admin | Updated: March 6, 2017 01:46 IST2017-03-06T01:45:54+5:302017-03-06T01:46:08+5:30

नाशिक : शिक्षण हक्क प्रवेशासाठी केलेल्या आॅनलाइन अर्जांची सोडत सोमवारी (दि. ६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात येणार आहे

Education rights; Leave today | शिक्षण हक्क; आज सोडत

शिक्षण हक्क; आज सोडत

नाशिक : शिक्षण हक्क प्रवेशासाठी केलेल्या आॅनलाइन अर्जांची सोडत सोमवारी (दि. ६) शासकीय कन्या विद्यालयात काढण्यात येणार आहे. त्याची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले.
सोडतीमध्ये संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. नर्सरी प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांचे
वय हे वयोमर्यादेच्या अटींमध्ये पात्र ठरत नसल्याने विद्यार्थ्यांवर वंचित राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे वयोमर्यादेत सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, एक किलोमीटर अंतर असलेल्या शाळांमध्ये ४
हजार ३४९ अर्ज, तर तीन कि.मी. अंतर असलेल्या शाळांत ११ हजार १३४ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत, तर तीन कि.मी.च्या पुढील शाळांसाठी १५९१ अर्ज आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Education rights; Leave today