शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:29 IST

इगतपुरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण सभापती यतिन पगार व शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देतीव्र उन्हाळा व दुष्काळामुळे १ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरविण्यात यावी

इगतपुरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण सभापती यतिन पगार व शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले.तीव्र उन्हाळा व दुष्काळामुळे १ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण सभापती यतिन पगार यांनी याबाबतचे आदेश त्वरित काढण्याची सूचना शिक्षणाधिकाºयांना केली.चटोपाध्याय वेतनश्रेणीबाबत झालेल्या चर्चेत सादर झालेल्या २०१ पैकी १९७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यापुढे चटोपाध्याय व निवडश्रेणी मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाºयांना देण्याबाबतची फाइल अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असून, लवकरच त्याबाबतचा आदेश निर्गमित होणार असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी झनकर यांनी, डीसीपीएसधारक शिक्षकांच्या कपातीचा हिशेबाबाबत झालेल्या चर्चेनुसार शासनाला हिश्शाची रक्कम आठ कोटी प्राप्त झाली असून, उर्वरित सात कोटी प्राप्त होताच सर्व डीसीपीएसधारकांना हिशेब मिळणार आहे.याबाबत संबंधित कारकून पांडव यांना तत्काळ अर्थ विभागालापत्र देण्याचा आदेश झनकर यांनी दिला.मुख्याध्यापक पदोन्नती बिंदू नामावली अपूर्ण असल्याने व केंद्रप्रमुख पदोन्नती न्यायप्रविष्ठ असल्याने सध्या होणार नाही, असेही झनकर यांनी सांगितले. शाळांनी काढावयाच्या जीएसटी नंबरबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून निर्णय कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या कुणीही जीएसटी नंबर काढण्याची घाई करू नये असे सांगितले. सदर चर्चेसाठी कार्याध्यक्ष अर्जुन ताकाटे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, राज्य सदस्य मिलिंद गांगुर्डे, रवि थोरात, प्रदीप शिंदे, दीपक सोनवणे, उमेश बैरागी, तालुकाध्यक्ष बच्छाव, अरु ण कापडणीस, देवीदास पवार, रवि देवरे आदी उपस्थित होते.तीव्र दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई याचा विचार करता संभाव्य हाल टाळण्यासाठी १ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा आदेश निघावा, यासाठी शिक्षण सभापती यतिन पगार व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लागतील.- अंबादास वाजेराज्य कार्याध्यक्ष, शिक्षक संघ