प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:29 IST2019-02-13T00:28:25+5:302019-02-13T00:29:16+5:30
इगतपुरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण सभापती यतिन पगार व शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले.

प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
इगतपुरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण सभापती यतिन पगार व शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले.
तीव्र उन्हाळा व दुष्काळामुळे १ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण सभापती यतिन पगार यांनी याबाबतचे आदेश त्वरित काढण्याची सूचना शिक्षणाधिकाºयांना केली.
चटोपाध्याय वेतनश्रेणीबाबत झालेल्या चर्चेत सादर झालेल्या २०१ पैकी १९७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यापुढे चटोपाध्याय व निवडश्रेणी मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाºयांना देण्याबाबतची फाइल अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असून, लवकरच त्याबाबतचा आदेश निर्गमित होणार असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी झनकर यांनी, डीसीपीएसधारक शिक्षकांच्या कपातीचा हिशेबाबाबत झालेल्या चर्चेनुसार शासनाला हिश्शाची रक्कम आठ कोटी प्राप्त झाली असून, उर्वरित सात कोटी प्राप्त होताच सर्व डीसीपीएसधारकांना हिशेब मिळणार आहे.
याबाबत संबंधित कारकून पांडव यांना तत्काळ अर्थ विभागाला
पत्र देण्याचा आदेश झनकर यांनी दिला.
मुख्याध्यापक पदोन्नती बिंदू नामावली अपूर्ण असल्याने व केंद्रप्रमुख पदोन्नती न्यायप्रविष्ठ असल्याने सध्या होणार नाही, असेही झनकर यांनी सांगितले. शाळांनी काढावयाच्या जीएसटी नंबरबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून निर्णय कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या कुणीही जीएसटी नंबर काढण्याची घाई करू नये असे सांगितले. सदर चर्चेसाठी कार्याध्यक्ष अर्जुन ताकाटे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, राज्य सदस्य मिलिंद गांगुर्डे, रवि थोरात, प्रदीप शिंदे, दीपक सोनवणे, उमेश बैरागी, तालुकाध्यक्ष बच्छाव, अरु ण कापडणीस, देवीदास पवार, रवि देवरे आदी उपस्थित होते.तीव्र दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई याचा विचार करता संभाव्य हाल टाळण्यासाठी १ मार्चपासून शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा आदेश निघावा, यासाठी शिक्षण सभापती यतिन पगार व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लागतील.
- अंबादास वाजे
राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक संघ