शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी बच्छाव, महाजन निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:58 IST

नाशिक : पदे नसताना शाळा, महाविद्यालयांना शिक्षकांची पदे मंजूर करणे, त्याचबरोबर या शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी देताना मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्याच्या कारणावरून राज्याचे शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा विभागीय उपसंचालक नितीन बच्छाव तसेच नाशिक महापालिकेचे प्रशासनाधिकारी देवीदास महाजन या दोघांनाही सेवेतून निलंबित केले आहे.

ठळक मुद्दे राज्य शासनाचे आदेश : शालार्थ आयडी भोवली; अधिवेशनात झाली होती चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पदे नसताना शाळा, महाविद्यालयांना शिक्षकांची पदे मंजूर करणे, त्याचबरोबर या शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी देताना मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्याच्या कारणावरून राज्याचे शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा विभागीय उपसंचालक नितीन बच्छाव तसेच नाशिक महापालिकेचे प्रशासनाधिकारी देवीदास महाजन या दोघांनाही सेवेतून निलंबित केले आहे.सोमवारी दुपारी या संदर्भातील आदेश प्राप्त झाले. शुक्रवार (दि. १३) रोजी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात शिक्षक मान्यतेच्या विषयावरून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, नितीन पवार, हिरामण खोसकर आदी सदस्यांनी शिक्षण विभागातील अनागोंदीबबत प्रश्न विचारला होता.दरम्यान, सोमवारी या संदर्भातील आदेश प्राप्त होताच, त्यात नितीन बच्छाव यांच्यासमवेत मनपा प्रशासनाधिकारी देवीदास महाजन यांनाही निलंबित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्याही कामकाजाची चौकशीसाठी शासनाने सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून, या दोघांवरील कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.देवीदास महाजन हे जळगावी माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी १९ शाळांचे प्रस्तावांना मान्यता दिली व सदरचे प्रस्ताव मान्यतेसाठी नाशिकच्या विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पाठविले होते. असाच प्रकार नाशिकचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केल्याची सदस्यांची तक्रार होती.

टॅग्स :SchoolशाळाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका