शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पथनाट्यातून तीस आदिवासी पाड्यांवर शिक्षण, आरोग्य जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:54 IST

जनसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत मानून अनेक सेवाभावी संस्था-संघटना कार्य करतात. परंतु त्यात सातत्य नसते. विशिष्ट कालखंडानंतर हा उपक्रम खंडित होतो. याला कारण म्हणजे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा सामाजिक बांधिलकीचा वारसा पोहचत नाही.

नाशिक : जनसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत मानून अनेक सेवाभावी संस्था-संघटना कार्य करतात. परंतु त्यात सातत्य नसते. विशिष्ट कालखंडानंतर हा उपक्रम खंडित होतो. याला कारण म्हणजे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा सामाजिक बांधिलकीचा वारसा पोहचत नाही. परंतु काही सेवाभावी संस्था मात्र अखंडपणे कार्य करतात. विवेकानंद प्रशिक्षण व सेवा प्रकल्पामार्फत मात्र गेल्या तीस वर्षांपासून आदिवासी भागात ३० पाड्यांवर शिक्षण व आरोग्याची जनजागृती करण्यात येत आहे.  शहरातील काही सेवाभावी संस्था दिवाळी आणि अन्य सण उत्सव काळात आदिवासी पाड्यावर जाऊन फराळ आणि कपडे वाटप करतात. नंतर वर्षभर या भागात फिरकत नाही तसेच चार-पाच वर्षांनंतर हा उपक्रमदेखील बंद पडतो. परंतु गेल्या तीस वर्षांपासून सुमारे तीस आदिवासी पाड्यांवर जाऊन शिक्षण आणि आरोग्य विषयक जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.विवेकानंद केंद्र नाशिक शाखा, नाशिकरोड येथील सावरकर विस्तार केंद्र आणि महाराष्ट्र मित्रमंडळ विष्णूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीस वर्षांपासून त्र्यंबकेश्वर, हरसूल आणि पेठ भागांतील तीस पाडे दत्तक घेण्यात आले आहेत.अखंडपणे उपक्रम सुरूदरवर्षी या भागात तीन-चार संस्थेचे कार्यकर्ते दर महिन्याला नियमितपणे क्रमाक्रमाने जातात. तेथे आदिवासी बांधवाबरोबर बैठका, सभा आणि गटचर्चा याद्वारे त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्याचप्रमाणे आपल्याकडील पाणी, इंधन व अन्य वस्तूंचे योग्य व्यवस्थापन व नियोजन कसे करावे, मुलांना व मुलींना शिक्षणाची आवश्यकता कशी आहे हेदेखील पथनाट्यातून सांगितले जाते. आरोग्य शिबिरे घेतली जातात. त्याचप्रमाणे सामाजिक संस्थेमार्फत जमा झालेले कपडे व फराळ यांचेदेखील योग्य पद्धतीने वाटप करण्यात येते. विवेकानंद प्रशिक्षण व सेवा प्रकल्प पिंपळद यांच्यामार्फत हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाEducation Sectorशिक्षण क्षेत्रHealth Tipsहेल्थ टिप्सNashikनाशिक