पुरस्कार न मागणाऱ्यांचा शिक्षण मंडळ करणार गौरव
By Admin | Updated: September 6, 2016 01:29 IST2016-09-06T01:28:02+5:302016-09-06T01:29:03+5:30
१७ शिक्षकांचा समावेश : लवकरच होणार सन्मान

पुरस्कार न मागणाऱ्यांचा शिक्षण मंडळ करणार गौरव
नाशिक : शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी अनेकदा अर्ज करावे लागतात, परंतु यंदा महापालिका शिक्षण मंडळाने अशाप्रकारे कोणत्याही प्रकारे अर्ज न मागवता शिक्षकांची माहिती संकलित करून त्यांना पुरस्कार जाहीर केले आहेत.
शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही नावे निश्चित करण्यात आली. यात मंगला रवींद्र शिंदे (मुख्याध्यापक, मनपा शाळा क्रमांक ७०, आडगाव), बाळसाहेब शिवराम कडलग (विद्यानिकेतन क्रमांक १३, देवळाली गाव), मंगला वामनराव शेलार (शाळा क्रमांक ९४, स्वारबाबानगर, सातपूर), चांगदेव नाना सोमासे (शाळा क्रमांक २६, शिवाजीनगर), पुंडलिक सोनू सोनवणे (शाळा क्रमांक २०, रायगड चौक), गुलाम हुसेन अन्सारी (शाळा क्रमांक १३२ देवळाली गाव), मंगल भिकन मोरे (शाळा क्रमांक ८६, मखमलाबाद), संगीता रवींद्र मदने (शाळा क्रमांक ३३, आनंदवल्ली) आदि शिक्षकांचा समावेश आहे, तर इस्पालियर स्कूलचे संचालक सचिन जोशी, सरस्वती विद्यालयचे बापूराव सोमनाथ पवार, मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी, शिक्षक मोहन बाजीराव माळी आणि आशा रावण क्षीरसागर आदि खासगी शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे.