शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे धरणे
By Admin | Updated: December 5, 2015 23:31 IST2015-12-05T23:29:53+5:302015-12-05T23:31:14+5:30
शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे धरणे

शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे धरणे
नाशिक : जागतिक व्यापार संघटनेला भारतातील शिक्षण क्षेत्र खुले करण्याला विरोध दर्शविण्यासाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात
आले.
जागतिक व्यापार संघटनेतील १६० देशांना भारतात शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणे सोपे होणार असून, त्यातून बाजारीकरण वाढणार आहे. याशिवाय स्वदेशीय शिक्षण संस्थांना मिळणाऱ्या सोयी, सवलती परदेशी संस्थांनाही देणे बंधकारक राहणार आहे, शिवाय कुठलाही विवाद झाल्यास देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा नव्हे, तर जागतिक व्यापार संघटनेचा निर्णय मान्य करावा लागणार आहे. भारतातील गरीब व वंचित लोक शिक्षणापासून त्यामुळे वंचित राहण्याची शक्यता असून, जागतिक व्यापारात विद्यार्थ्यांची फसवणूक व शिक्षकांचे शोषण होईल. या साऱ्या गोष्टींचा विचार करता भारताने शिक्षण क्षेत्र जागतिक व्यापार संघटनेसाठी खुले करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात डॉ. मिलिंद वाघ, छाया देव, श्रीधर देशपांडे, मुकुंद दीक्षित, अरुण धामणे, विनायक येवले, सचिन मालेगावकर, दिनेश बकरे, रामदास भांड, भगवान जगताप, प्र. तु. पाटील, डॉ. लक्ष्मीकांत कावळे, मनीषा देशपांडे, महादेव खुडे आदिं सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)