शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत भाविकांची आर्थिक लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:08 IST

दिवाळी सुटीनिमित्त पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची पंचवटीतील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे. नियमबाह्य रिक्षाभाडे देण्याच्या कारणावरून भाविक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा तू तू-मैं मैं होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणीनागरिकांनी केली आहे.

पंचवटी : दिवाळी सुटीनिमित्त पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची पंचवटीतील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे. नियमबाह्य रिक्षाभाडे देण्याच्या कारणावरून भाविक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा तू तू-मैं मैं होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणीनागरिकांनी केली आहे.  पंचवटीत राममंदिर, सीतागुंफा, तपोवन, गंगाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात परराज्यातील भाविक येत असतात. दर्शनासाठी येणारे भाविक आपली चारचाकी वाहने गंगाघाटावरील वाहनतळावर उभी करतात व तेथून पुढे रिक्षाने पंचवटीचे दर्शन करतात. भाविकांना काळाराम मंदिर, सीतागुंफा, रामकुंड, काट्या मारुती, लंबा हनुमान, तपोवन आदींसह अन्य मंदिरांतील देवदेवतांचे दर्शन रिक्षाचालक घडवितात. सदर रिक्षाचालक रिक्षात ७ ते ८ प्रवासी बसवून प्रत्येक प्रवाशाकडून किमान शंभर रु पये याप्रमाणे ७०० ते ८०० रुपये याप्रमाणे भाडे आकारत असल्याची चर्चा आहे. पंचवटी दर्शन घडविताना रिक्षाचालक भाविकांना मंदिराची संपूर्ण माहिती देत नाही शिवाय मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना लगेच परत येण्याचा आग्रह धरतात तर काही रिक्षाचालक मंदिराला प्रदक्षिणा मारू न देता भाविकांना रिक्षात बसण्याची घाई करतात. त्यामुळे रिक्षाचालक आणि भाविकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण होतात.  वाद झाल्यानंतर काही रिक्षाचालक तर सदर भाविकांना अर्ध्या रस्त्यातच उतरवून देण्याची धमकी देतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांत अनेकदा असे गैरप्रकार घडत असल्याने नाशिकला पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.रिक्षाचालकांवर कारवाई नाहीपंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना पंचवटी दर्शनाची सफर घडविताना रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. त्यातून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे गंगाघाटावर रोजच वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांच्या डोळ्यादेखत वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली रिक्षाचालक करीत असले तरी त्यांच्यावर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभाग कोणतीही दंडात्मक कारवाई करत नाही.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस