पेठ - पर्यावरणाचे संतुलन व प्लॅस्टिकबंदीला प्रोत्साहन मिळावे यासाठी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. उपक्र मशील शिक्षक अरु ण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील चिमुकल्यांनी रंगीत कागदापासून घरगूती आकाश कंदील तयार केले. पालकांनीही आपल्या चिमूकल्यांचे कौतूक करत त्यांनी बनवलेला आकाश कंदील घरासमोर लावण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रकारचे फटाके फोडणार नसल्याची शपथही घेतली. शिक्षक अरु ण बेलदार यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी भागातील पालकांना व मुलांना यावेळी फराळाचे वाटप करण्यात आले.
बोंडारमाळच्या चिमुकल्यांची इकोफ्रेंडली दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 14:40 IST