इको फे्रण्डली आकाश कंदिलाला कलात्मक रूप

By Admin | Updated: October 28, 2015 21:25 IST2015-10-28T21:20:44+5:302015-10-28T21:25:03+5:30

इको फे्रण्डली आकाश कंदिलाला कलात्मक रूप

Eco Ferndly Akash Kandilala artistic form | इको फे्रण्डली आकाश कंदिलाला कलात्मक रूप

इको फे्रण्डली आकाश कंदिलाला कलात्मक रूप

नाशिक : चांदणी, थ्रीडी, अंब्रेला, हंडी, पंचकोनी, षटकोनी, चौकोनी, कमळ, इंद्रधनुष्य, समोसा, चॉकलेट, सफरचंद, अननस, कलश असे नानाविध आकारांतील आकाशकंदील नाशिकच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. दिवाळी सणाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच या सणाला प्रकाशाचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते. दिवाळीमध्ये घरोघरी आकाशकंदील लावण्याची प्रथा असल्याने बाजारातील आकर्षक आकाशकंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
४पारंपरिकता जपत काही तरी नवीन हवे या उद्देशाने बाजारात फॅन्सी आकाशकंदिलांबरोबरच पारंपरिक आकाशकंदिलांनादेखील विशेष मागणी आहे. पूर्वी बांबूच्या काड्या आणि इतर हस्तकलांच्या सहाय्याने पर्यावरणपूरक असे आकाशकंदील बनवले जात; परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच वेळ काढणे शक्य नसल्याने रेडिमेड आकाशकंदील खरेदीचे प्रमाण वाढले आहे.
४पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, तसेच पर्यावरण संवर्धनाची सवय लहान वयापासूनच व्हावी यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेचेदेखील आयोजन शहरात काही ठिकाणी करण्यात आले होते. पर्यावरणपूरक आकाशकंदिलाचा विचार करता अगदी दहा रुपयांपासून आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपल्या देशातील बाजारपेठ चायना वस्तूंनी जरी काबीज केली असली, तरी प्रत्येक भारतीयाने आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे पर्यावरणपूरक आकाशकंदील विक्रेते प्रशांत परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मेक इन इंडियाचा नारा देत असतानाच विविध सणांना लागणाऱ्या वस्तू बनविण्याची प्रशिक्षण केंदे्र सरकारने उभारायला हवीत, असे मतही परदेशी यांनी यावेळी व्यक्त केले.
४नाशिकच्या बाजारपेठेत मुंबई, कोलकाता, केरळ या ठिकाणांहून आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले असून, केरळ येथून येणाऱ्या चांदणीच्या आकारातील आकाशकंदिलांना विशेष मागणी आहे. ख्रिस्ती बांधवांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाताळ सणासाठी अनेक ख्रिस्तीबांधव दिवाळीच्या काळातच आकाशकंदील घेऊन जात असल्याचे विक्रेते इम्रान सय्यद यांनी सांगितले.

Web Title: Eco Ferndly Akash Kandilala artistic form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.