येवल्यातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:18 IST2020-01-16T22:26:29+5:302020-01-17T01:18:10+5:30
येवला तालुक्यातील रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांची वाहने खिळखिळी, तर चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्ड्यांच्या ग्रहणातून येवलेकरांचे सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

येवल्यातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण
येवला : शहरासह तालुक्यातील रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांची वाहने खिळखिळी, तर चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्ड्यांच्या ग्रहणातून येवलेकरांचे सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
निधी येणार आणि येवला शहरातील सगळे रस्ते होणार हे
गेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या वतीने वारंवार सांगितले जात असले तरी रस्ते होत नाहीत. खड्डेदेखील बुजवले जात नाहीत. पालिकेत गल्ली ते दिल्ली सत्ता असताना शहराची परिस्थिती बदलण्याची अपेक्षा फोल ठरलेली दिसून येत आहे. जागोजागी मोठेमोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरातील गंगादरवाजा ते कोर्ट रस्ता, जुनी नगरपालिका थिएटररोड, मेनरोडची चाळण झाली आहे. पायी चालणेदेखील जिकरीचे झाले आहे. वाहन चालवताना अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवून नागरिकांचे हाल थांबवावे, अशी मागणी होत आहेत.
पालकमंत्र्यांच्या सूचनेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
येवला मतदारसंघातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून, अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. काही रस्त्यांची द्वैवार्षिक देखभाल दुरु स्ती करण्यासाठी निविदाप्रक्रि या सुरू असली तरी ही प्रक्रि या तातडीने अंतिम करून या रस्त्यांची दुरु स्ती हाती घेण्यात आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
कामाचा देखावा; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
रस्त्याची अधूनमधून दुरुस्ती करण्यात येत असते. मात्र,
काम होताच महिनाभरातच उखडतो आणि पुन्हा खड्डे
होतात. पालिकेकडे जाणारा रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक
दिसेनासे झाले आहेत व हीच अवस्था राणाप्रताप खुंटावरील रस्त्याची झाली आहे. त्यामुळे कामांचा केवळ देखावा केला जात असून, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर सत्ता आणि पदे मिळवण्याच्या गर्तेत असणारे नगरसेवक कर्तव्य पार पडणार की नाही? असा प्रश्न येवलेकरांकडून विचारला जात आहे.