सकस आहार वाढवा, तंदुरुस्त व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST2021-05-12T04:15:18+5:302021-05-12T04:15:18+5:30

सध्या कोरोनाचा संकट काळ असून त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भर दिला जात आहे. फळे आणि कडधान्य तसेच अन्य काही पदार्थांबाबत ...

Eat a healthy diet, stay fit! | सकस आहार वाढवा, तंदुरुस्त व्हा!

सकस आहार वाढवा, तंदुरुस्त व्हा!

सध्या कोरोनाचा संकट काळ असून त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भर दिला जात आहे. फळे आणि कडधान्य तसेच अन्य काही पदार्थांबाबत तज्ज्ञ समर्थन करीत आहेत. रोगप्रतिकारक्ती वाढवणाऱ्या औषधांबरोबरच केंद्र शासनाने आता मायगोवइंडिया या ट्वीटर हँडेलवर काही पदार्थांची यादी दिली असून ताणतणाव घटविण्यासाठी डार्क चॉकलेटदेखील उपयुक्त आहे. हळदीचे दूध, कडधान्य तसेच मांसाहार आणि अंडी अशा एकूण १९ पदार्थांची यादी शासनाने जाहीर केली आहे अर्थात, संपूर्ण आहाराविषयी मार्गदर्शन केलेले नसले तरी केवळ आहाराच्या काही टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे आणखी पूरक अन्नधान्य आहरात असले पाहिजे असे आहार तज्ज्ञांचे मत आहे. शासनाने सुचवलेल्या रोगप्रतिकार शक्तीवर्धक आहाराबरोबर आवळा ज्युस, कोकम सरबत यांचा वापर करावा, किसमिस, खजूर, अंजीर, घरगुती बाजरीची पेज, शेंगदाणे, गूळदेखील उपयुक्त आहे, असे काही तज्ज्ञांनी सांगितले.

कोट...

डार्क चॉकलेट सहजासहजी उपलब्ध होतात असे नाही. त्यामुळे खजूर, आक्रोड, बदाम मनुका, बदाम, अंजीर, गूळ-शेंगदाणे, गूळ-फुटाणे घेतले पाहिजे. दररोज आहारात एक आंबा आणि एक बाऊल पपई खावी. तसेच ग्लास दुधात चिमूटभर हळद, जायफळ, काळीमिरी, सुंठ, लवंग घालून घ्यावे तसेच शेवग्याचा रस्सा, चिमूटभर मीठ, हळद, जिरे पूड घालून प्यावे.

- रश्मी साेमाणी, आहारतज्ज्ञ (छायाचित्र आर फोटोवर)

कोट...

कोरोना झाला असेल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी शाकाहार अत्यंत उत्तम आहे. आजार झाल्यानंतर औषधांचे डोस आणि अन्य कारणांमुळे शरीराची झीज होते. त्यावेळी मांसाहार उत्तम. परंतु अन्य वेळी मांसाहार टाळावा, मसाल्याचे पदार्थ कमीत कमी वापरावे, शरीर अल्कलाईन मोडमध्ये असावे, ॲसेडिक मोड नसावा त्यामुळे संसर्ग लवकर होऊ शकतो. तसेच एकाच वेळी पोट भरून जेवण्यापेक्षा दिवसातून चार ते पाच वेळा आहार घेणे योग्य आहे.

- रंजीता शर्मा, आहार तज्ज्ञ (छायाचित्र आर फोटोवर)

कोट...

घरगुती अन्नपदार्थात प्रथिनयुक्त डाळी, मोडाची कडधान्ये, उसळ, सोया यांचा वापर केल्यास स्नायूंचा कमकुवतपणा भरून निघेल. वीटामीन सीसाठी आवळा ज्युस, कोकम सरबत, संत्रा, मोसंबी तसेच किसमिस, अंजीर, घरगुती गूळ-शेंगदाणे, बाजरीची पेज याचा वापर करावा. किसमिस, खजूर, अंजीरदेखील आहारात असावे.

मीनल बाकरे-शिंपी, आहारतज्ज्ञ (छायाचित्र आर फोटोवर)

Web Title: Eat a healthy diet, stay fit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.