वृद्धेला फसवून आठ तोळे सोन्याची चोरी
By Admin | Updated: January 10, 2017 01:43 IST2017-01-10T01:43:34+5:302017-01-10T01:43:47+5:30
वृद्धेला फसवून आठ तोळे सोन्याची चोरी

वृद्धेला फसवून आठ तोळे सोन्याची चोरी
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेला फसवून सुमारे आठ तोळे सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. येथील बसस्थानक परिसरात संदीप प्रभाकर खुळे यांचे घर आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संदीप यांच्या मातोश्री सुभद्राबाई एकट्याच घरी होत्या. यावेळी हीरो-होंडा पॅशन दुचाकीहून साधारण २५ वर्षे वयोगटातील एक तरुण खुळे यांच्या घरी आला. संदीप यांच्या मेव्हण्याचा अपघात झाला असून, त्यांच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे. पैशांची तजवीज करण्यासाठी घरातील सर्व सोने बँकेत गहाण ठेवायचे आहे, त्यासाठी सोन्याचे दागिने व आधारकार्ड - रेशनकार्डची मागणी चोरट्याने सुभद्राबाई यांच्याकडे केली. संदीप यांच्याशी भ्रमणध्वनीहून बोलत असल्याचा बनाव करत चोरट्याने कपाटाची उचक-पाचक सुरू केली. कपाटातून हाती आलेला सुमारे आठ तोळे सोन्याचा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला. काही वेळाने घरी आलेल्या संदीप यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.