शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय : घरांवरील पत्रे हादरले, भांडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:52 IST

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी भीतीपोटी रात्र जागून काढलीदळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. भूकंपाच्या या धक्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरातील भांडे पडली, घरांवरील पत्रे हादरली. दळवट हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. याबाबत मेरी कार्यालयाशी संपर्क साधला असता सकाळी ११ वाजेपर्यंत भूकंप मापक यंत्रावर कोणत्याची प्रकारची नोंद नसल्याचे कार्यालयातील चारु लता चौधरी यांनी सांगितले. तहसीलदार कैलास चावडे यांनी सौम्य धक्के बसल्याचे मान्य करत कुठेही मालमत्तेची अथवा जीवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. तर महसूल आणि पोलीस यंत्रणेने दळवट परिसरात भेटी देऊन आदीवासी बांधवांशी चर्चा करु न त्यांना दिलासा दिला.दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्क्षण पवार , यशवंत पवार यांनी भूकंपाच्या ह्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असल्याचे सांगितले. दळवट परिसर १९९५ पासून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने या भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ै जयश्री पवार यांनी केली आहे.यंत्रणा कार्यान्वित कराच्दळवट परिसरात नेहमी असे धक्के बसत असतात. भूकंपमापन यंत्रच नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शासनाने दळवट व परिसरातील भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र बसवावे. त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता तसेच पुर्वसुचना लक्षात येईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे.आता तरी लक्ष द्याच्सप्टेंबर २०१३ मध्ये बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड, अंबिका, ओझर आदी परिसरात सलग ४ ते ५ दिवस भूकंपाचे धक्के बसले होते. या भागात भ्रमणध्वनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. अशा परिस्थितीत अघटित घडले तर आम्ही काय करायचे, असा सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.