पेठ तालुक्यात जाणवले भूकंपसदृश धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:42 AM2019-05-04T01:42:22+5:302019-05-04T01:42:40+5:30

पेठ तालुक्यातील गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

Earthquake shook in Peth taluka | पेठ तालुक्यात जाणवले भूकंपसदृश धक्के

पेठ तालुक्यात जाणवले भूकंपसदृश धक्के

Next

नाशिक : पेठ तालुक्यातील गोंदे भायगाव परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवले. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारी रात्री ९ वाजून ६ मिनिटांनी आमदाडोह भागात मोठा आवाज होऊन परिसरात हादरे बसल्याचे जाणवले. यामुळे गोंदे, भायगाव, देवगाव, निरगुडे भागातील ग्रामस्थ सतर्क झाले. तलाठी, ग्रामसेवक व पोलीसपाटील यांनी दूरध्वनीवरून प्रशासनाला माहिती कळवली.
गोंदे भागात भूकंपमापकयंत्र बसविण्याची ग्रामस्थांची जुनी मागणी असून ती अद्यापही पूर्ण झालेली नाही.

Web Title: Earthquake shook in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.