वावी येथील युवकावर बिबट्याचा हल्ला

By Admin | Updated: May 7, 2016 23:36 IST2016-05-07T23:15:11+5:302016-05-07T23:36:34+5:30

वावी येथील युवकावर बिबट्याचा हल्ला

Dwy attack on the young man of Wavi | वावी येथील युवकावर बिबट्याचा हल्ला

वावी येथील युवकावर बिबट्याचा हल्ला


निफाड : वावी येथे शनिवारी दुपारच्या सुमारास बिबट्याने युवकावर हल्ला करून किरकोळ जखमी केल्याची घटना घडली आहे.
येथील सतीश त्र्यंबक जगताप (२४) हा दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या शेतातील विहिरीवरील कृषिपंप चालू करण्यासाठी गेला असता, शेतातील मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सतीशवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्याने सतीश जमिनीवर खाली पडला. हल्ला करून बिबट्या तत्काळ पसार झाला. यात जखमी झालेल्या सतिशवर निफाड येथे वैद्यकीय उपचार करण्यात आले. सदरची घटना वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर येवल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकनर, वन कर्मचारी दिलीप अहिरे, लोंढे आदिंनी जगताप यांच्या शेतात भेट देऊन माहिती घेतली. (वार्ताहर)

Web Title: Dwy attack on the young man of Wavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.