‘द्वारकाधीश’चे सर्वाधिक गाळप
By Admin | Updated: April 3, 2016 23:17 IST2016-04-03T23:16:38+5:302016-04-03T23:17:23+5:30
शेवरे : साखर कारखान्याने दिला २०२५ रु पये भाव

‘द्वारकाधीश’चे सर्वाधिक गाळप
सटाणा : बागलाण तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने यंदा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक चार लाख ५८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून पाच लाख दोन हजार क्विंटल साखरचे उत्पादन घेतले असून, यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन १८५० रुपये पहिले पेमेंट अदा केले आहे. एफआरपीनुसार एकूण २०२० रुपये पेमेंट होत असले तरी कारखान्याकडून ऊस उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून २०२५ रुपये भाव देण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली.
शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची आवारातील द्वारकाधीश मंदिरात शेवटच्या साखर पोत्याचे पूजन करून सांगता करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, मविप्रचे माजी संचालक नारायण कोर, शेतकरी के.पी. जाधव, काशीनाथ नंदन, सुभाष कांकरिया, बेबीबाई नंदन, रामदास नंदन, मोहनाबाई सूर्यवंशी, धनलाल सूर्यवंशी यांच्या हस्ते वैदिक पद्धतीने साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. प्रारंभी कारखान्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्षेत्रात कारखान्याच्या आडसाली योजनेअंतर्गत एक हजार एकर वर उसाची लागवड करण्यात आली होती त्यातून सरासरी ६० ते ८० मेट्रिक टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आगामी गळीत हंगामातही आडसाली योजना सुरू राहणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सावंत यांनी जाहीर केले. कारखान्याच्या धोरणानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्याचे फलित म्हणून मात्र काही कारखाने हा कायदा पायदळी तुडवून शेतकऱ्यांवर अन्याय करते एफआरपीनुसार एकूण पेमेंट २०२० रुपये होते; मात्र कारखान्याने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिटनामागे पाच रुपये जास्त देण्यात येतील, असेही यावेळी अध्यक्ष सावंत यांनी जाहीर केले. या प्रसंगी सुधाकर पाटील, पंकज दुसाने, विनायक चिंचोरे, देवीदास अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र मास जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंतबापू अहिरे, मोठाभाऊ बोरसे, नथू पवार, बाबाजी भामरे, भटू नंदन, शंकर साळुंखे, बन्सीलाल बत्तीसे, रघुनाथ निकम, मधुकर काचवे, एम.ए. पटेल, विजय पगार, रामदास घोडके, गोपीनाथ शेलार, सतीश सोनवणे, राजू धोंडगे यांच्यासह निफाड, शिरपूर, साक्री, कळवण, नांदगाव, नवापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी परेश साखरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)