द्वारका-नाशिकरोड उड्डाणपुलाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST2017-08-04T23:36:43+5:302017-08-05T00:20:00+5:30

नाशिक-पुणेरोडवरील द्वारका चौक ते नाशिकरोड या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी द्वारका चौकातून थेट उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला गती दिली आहे.

Dwarka-Nashik Road flyover survey | द्वारका-नाशिकरोड उड्डाणपुलाचे सर्वेक्षण

द्वारका-नाशिकरोड उड्डाणपुलाचे सर्वेक्षण

नाशिक : नाशिक-पुणेरोडवरील द्वारका चौक ते नाशिकरोड या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी द्वारका चौकातून थेट उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला गती दिली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाला छेदणाºया द्वारका चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून, त्यावर अनेक उपाययोजना व तोडगे सुचवूनही प्रश्न सुटू शकलेला नाही. आठ मार्ग एकत्र येत असलेल्या या चौकात यापूर्वी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो अयशस्वी ठरल्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत द्वारका चौकात पादचाºयांसाठी भुयारी मार्गही निर्माण करण्यात आला. त्यामाध्यमातून द्वारका चौकातील पादचाºयांची गर्दी कमी होईल असा अंदाज बांधण्यात आला, परंतु नव्याने नऊ दिवसांनंतर या भुयारी मार्गाची अवस्था बिकट झाली. आजही सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व सायंकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत द्वारका चौकात वाहतुकीची कोंडी होत असून, पुढे पुण्याकडे जातानाही नाशिकरोडच्या उड्डाणपुलापर्यंत प्रवास करताना वाहनांना मुंगीच्या पावलाने मार्गक्रमण करावे लागत आहे. द्वारका ते नाशिकरोड दरम्यान वाहतुकीची होणारी कोंडी व त्यातून घडणारे नियमित अपघात पाहता या रस्त्याचे रुंदीकरण करूनही फारसा फायदा

 

Web Title: Dwarka-Nashik Road flyover survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.