शुल्क नियंत्रण कायदा लवकरच शिक्षणमंत्री तावडे : सीईटीसाठी दहावी, बारावीचा अभ्यासक्रम
By Admin | Updated: March 9, 2015 00:27 IST2015-03-09T00:26:34+5:302015-03-09T00:27:00+5:30
शुल्क नियंत्रण कायदा लवकरच शिक्षणमंत्री तावडे : सीईटीसाठी दहावी, बारावीचा अभ्यासक्रम

शुल्क नियंत्रण कायदा लवकरच शिक्षणमंत्री तावडे : सीईटीसाठी दहावी, बारावीचा अभ्यासक्रम
नाशिक : ज्ञानदानासारखे पवित्र कार्य शिक्षणसम्राटांच्या हातात गेल्याने काही वर्षांत शिक्षणासाठी अवास्तव शुल्क आकारणी सुरू झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावर प्रतिबंध बसावा यासाठी लवकरच शुल्क नियंत्रण कायदा (फी रेग्युलेशन अॅक्ट) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित ‘डिपेक्स २०१५’ या प्रदर्शनात आले असता ते बोलत होते. ते म्हणाले, यापुढे शिक्षणाची जबाबदारी शिक्षणसम्राटांकडे न देता ती शिक्षणतज्ज्ञांकडे देण्यास प्राधान्य दिले जाईल. या दोन्ही गोष्टींमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. याशिवाय सीईटीची परीक्षा दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र महागडे क्लास लावण्याची गरज राहणार नाही असा दिलासाही त्यांनी पालकांना दिला. विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांमुळे पालकांची होणारी फरपट थांबविण्यासाठी एक विद्यापीठ एक अभ्यासक्रम करण्याचाही आमचा विचार असून, अॅडव्हान्स अभ्यासक्रम केवळ काही शहरांपुरता मर्यादित ठेवला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडणार नाही याची खबरदारी घेतली जाई, असेही तावडे म्हणाले. संशोधनाच्याबाबतीत बोलताना ते म्हणाले की, संशोधन हे केवळ पगारवाढीसाठीच केले जाते. त्यामुळे देशाला काय फायदा आहे याकडे बघितले जात नाही. आता प्रत्येक संशोधनातून देशाला फायदा होण्यासाठी इनोव्हेशन कौंसिल स्थापन करून त्याद्वारे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि संशोधनाच्या मानसिकतेतून प्रयोग करणाऱ्यांसाठी आर्थिक तरतूद वाढवणार असल्याचे तावडे म्हणाले.