दत्तनगरला जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 15:32 IST2017-08-16T15:32:49+5:302017-08-16T15:32:54+5:30

duttanagar gambler centre police raid | दत्तनगरला जुगार अड्डयावर छापा

दत्तनगरला जुगार अड्डयावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक :
पेठरोडवरील दत्तनगर कॅनॉल नजिक असलेल्या श्रीकृष्ण सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १ मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पंचवटी पोलीसांनी छापा मारून तब्बल २० जुगाºयांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून पोलीसांनी ७१ हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.
श्रीकृष्ण सोसायटीत चोरी छुप्या पद्धतीने जुगार अड्डा चालवित असल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, हवलदार प्रविण कोकाटे यांच्या पथकाने छापा मारला. याठिकाणी विनायक विठ्ठल गायकवाड, शशि वाघ, दिपक फडवळ, शाहीद शेख, पडाल तडमाखे, हरिप्रसाद भट्ट, सचिन पगारे, संजय कनाटे, लखन तडमाठे, नितीन भडके, मुकेश कडलग, लक्ष्मण पिंगळे, शरद भोर, संजय बोरसे, विठ्ठल धोत्रे, बंटी थेटे, सोमनाथ पिंगळे, अमोल कसबे, सचिन काकड, गोरख मानकर असे जवळपास २० संशयित ५२ पत्तयावर पैसे लावून जुगार खेळतांना आढळून आल्याची माहीती पंचवटी पोलीसांनी दिली आहे.

Web Title: duttanagar gambler centre police raid