घोटी : केंद्रीय मार्ग निधीतून घोटी शहरातील अंतर्गत सिमेंट कॉँक्रीटीकरण कामाचा पहिल्याच पावसात फज्जा उडाला असनू, या रस्त्यालगतची नाले व गटारीची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण ठेवल्याने पावसाच्या पाण्याचा विसर्गच होत नसल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. दरम्यान, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त होत आहे.घोटी शहरातील अंतर्गत रस्त्याचे दोन वर्षांपासून केंद्रीय मार्ग निधीतून कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यालगतच्या नाल्याचे काम मात्र अनेक ठिकाणी अर्धवट ठेवण्यात आले आहे. या नाल्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांसह रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही हे काम संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून घोटी शहरात होणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी नाल्यात तुंबून राहत आहे. या पाण्याचा विसर्ग होत नसल्याने हे पाणी थेट रस्त्यावर साचत असल्याने रस्ता पाण्याखाली जात आहे. यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांना या पाण्यातून मार्गक्र मण करताना कसरत करावी लागत आहे. या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
घोटी येथे गटारीच्या कामाचा फज्जा
By admin | Updated: July 18, 2014 00:36 IST