कोरोना काळात २० चिमुकल्यांना मिळाले आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:11+5:302021-09-26T04:16:11+5:30

अमेाल यादव, नाशिक : मातृत्व- पितृत्व आयुष्यातील एक सुखद क्षण. मात्र काही कारणामुळे अपत्य झाले नाही तर अनेक जण ...

During the Corona period, 20 Chimukals got parents | कोरोना काळात २० चिमुकल्यांना मिळाले आई-बाबा

कोरोना काळात २० चिमुकल्यांना मिळाले आई-बाबा

अमेाल यादव, नाशिक : मातृत्व- पितृत्व आयुष्यातील एक सुखद क्षण. मात्र

काही कारणामुळे अपत्य झाले नाही तर अनेक जण निराश न होता बालकं दत्तक

घेऊन आनंद तर घेताच परंतु सामाजिक संवेदनशीलतेचेही दर्शन घडवतात.

नाशिकच्या आधाराश्रमात दाखल होणाऱ्या मुलांना दत्तक दिले जाते, परंतु

कोरोनामुळे सर्वत्र अस्थिरतेचे वातारवण असतानाही या आधाराश्रमातील २०

बालकांना मायेची ऊब मिळाली आहे. अनेक कनवाळू जोडप्यांनी आधाराश्रमातील या

चिमुकल्यांना मायेचा आसरा दिला आहे.

विशेष म्हणजे यंदा प्रथमच अनाथाश्रमात वर्षभरात दाखल झालेल्या

बालकांच्या तुलनेत दत्तक दिलेल्या बालकांची संख्या दोनने अधिक आहे.

काही सामाजिक आणि व्यक्तिगत कारणांमुळे नकोसा किंवा नकोशी झालेल्या

बालकांना निराधार सोडून दिले जाते. अशा निराधार सोडलेल्या बालकांना आधाराश्रमसारख्या अनेक संस्था आधार देत असतात. आणि त्यातील काही दाम्पत्य यातील काही मुलांना

दत्तक घेऊन त्यांना कुटुंबातील सदस्य करून घेतात. अशाच प्रकारे बेवारस

आढळलेल्या, पालकांनी नाकारलेली किंवा विविध कारणांनी कुटुंबापासून

दुरावलेल्या बालकांना हजारो बालकांना घारपुरे घाटावरील नाशिक

आधाराश्रमाने वेळोवेळी आधार दिला आहे. आधाराश्रमात सद्यस्थितीत १२० बालके

आश्रित असून यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ५० मुले आणि शून्य ते १२

वर्षे वयोगटातील ७० मुलींचा समावेश आहे. कोरोनामुळे पालकांचे निधन

झाल्याने मागील दीड वर्षात हजारो बालके पोरकी झाली. तर काही पालकांना

आपले पाल्यदेखील गमवावे लागले. अशा काळात आधाराश्रमातील २० चिमुकल्यांना

आई-बाबांच्या मायेची ऊब मिळाली आहे. मागील काही वर्षांचा विचार करता

दत्तक विधान झालेल्या बालकांच्या तुलनेत दाखल झालेल्या बालकांची संख्या

अधिक दिसून येते. मात्र, २०२१ या वर्षात आश्रमात १८ बालके दाखल झालेली असताना २०

बालकांचे दत्तक विधान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील

वर्षी मार्च माहिन्यात अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने या कालावधीत होणारी

१० बालकांची दत्तक विधान प्रक्रिया रखडली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर जुलै महिन्यात ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ववत सुरू आहे.

------

कोरोनामुळे सुरुवातीला बालके दत्तक देण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला.

मात्र, पहिली लाट ओसरल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा पूर्ववत झाली. कोविड

काळात कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत ४८ ते ७२ तास काम केले.

त्यामुळे सर्व बालके सुरक्षित राहिली. या काळात आर्थिक संकटेदेखील आली.

मात्र, नियमित देणगीदारांशी संपर्क साधल्यानंतर अनेकांनी मदत केली.

- राहुल जाधव,

सीओ, आधाराश्रम नाशिक.

--------

२०१९-२०

दाखल

मुले : २१

मुली : १९

एकूण : ४०

--

दत्तक

मुले : १०

मुली : १५

एकूण : २५

----

२०२०-२१

एकूण दाखल

मुले : ७

मुली : ११

एकूण : १८

--

दत्तक

मुले : ११

मुली : ०९

एकूण : २०

Web Title: During the Corona period, 20 Chimukals got parents