दुर्गामाता ट्रस्टतर्फे अपंगांना साहित्य वाटप
By Admin | Updated: December 4, 2015 22:14 IST2015-12-04T22:14:16+5:302015-12-04T22:14:45+5:30
दुर्गामाता ट्रस्टतर्फे अपंगांना साहित्य वाटप

दुर्गामाता ट्रस्टतर्फे अपंगांना साहित्य वाटप
नाशिकरोड : जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र फेडरेशन आॅफ दि ब्लार्इंड व दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील २०० हून अधिक अंधांना शैक्षणिक व मनोरंजन खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
जेलरोड येथील श्री राजराजेश्वरी मंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक शैलेश ढगे, लायन्स क्लबचे पुरुषोत्तम ललवाणी, बांधकाम व्यावसायिक भगत आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लुई ब्रेल व डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, धुळे या भागांतील २०० हून अधिक अंधांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. १ली ते ५ वी, ६ वी ते ८ व ९वी ते १२ वी अशा तीन गटांमध्ये अंध विद्यार्थ्यांना ब्रेल, गणित लिखाण पाटी, भूमिती विषयाचे साहित्य, चित्रकला साहित्य, साधी काठी, इलेक्ट्रॉनिक काठी, क्रिकेट चेंडू, सापशिडी, चौपट, बुद्धिबळ बोर्ड आदिंचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ दि ब्लार्इंडचे हिरामण टिळे यांनी प्रास्ताविकामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी लवकरच ई-बुक लायब्ररी सुरू करणार असल्याची घोषणा केली. सूत्रसंचालन राजेंद्र सोनकर व आभार नगरसेवक शैलेश ढगे यांनी मानले. (प्रतिनिधी)