बंगाली बांधवांतर्फे दुर्गा पूजा महोत्सव

By Admin | Updated: October 16, 2015 22:36 IST2015-10-16T22:36:12+5:302015-10-16T22:36:40+5:30

बंगाली बांधवांतर्फे दुर्गा पूजा महोत्सव

Durga Puja Festival by Bengali Bandh | बंगाली बांधवांतर्फे दुर्गा पूजा महोत्सव

बंगाली बांधवांतर्फे दुर्गा पूजा महोत्सव

नाशिक : गंगापूररोड येथील सावरकर नगरमधील बंगाली बांधवांच्या बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने येत्या १९ पासून दुर्गा पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण मुखर्जी, उपाध्यक्ष बरुन पाल, दुर्गा पूजा महोत्सवाचे अध्यक्ष समर बॅनर्जी, एच. एस. बॅनर्जी, ए. के. साहा, गौतम नाग, बी. आर. घोष, प्रसांता भट्टाचार्य, प्रियनाथ घोष, अमिताभ चक्रवर्ती, सुसलव बिस्वास, अनिमेश मुखर्जी, शांतनुरे, शीला घोष, शेखर दत्ता यांनी या उत्सवाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक हे उपस्थित राहणार आहेत. येत्या २३ तारखेपर्यंत बंगाली बांधवांचा दुर्गा पूजा महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहे. दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत दररोज महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Durga Puja Festival by Bengali Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.