बंगा संजोगतर्फे दुर्गापूजा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:54 IST2017-09-26T00:54:49+5:302017-09-26T00:54:58+5:30
शहरातील बंगाली बांधवांच्या बंगा संजोग फाउंडेशनतर्फे गंगापूर रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये भव्य दुर्गादेवी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे़ या उत्सवाचा प्रारंभ महाशष्टीपासून अर्थात मंगळवार (दि़२६) पासून होणार असून, तो शनिवारी (दि़३०) सांगता होणार आहे़ या पूजेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे़

बंगा संजोगतर्फे दुर्गापूजा महोत्सव
नाशिक : शहरातील बंगाली बांधवांच्या बंगा संजोग फाउंडेशनतर्फे गंगापूर रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये भव्य दुर्गादेवी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे़ या उत्सवाचा प्रारंभ महाशष्टीपासून अर्थात मंगळवार (दि़२६) पासून होणार असून, तो शनिवारी (दि़३०) सांगता होणार आहे़ या पूजेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे़ शहरात गत पाच वर्षांपासून नवरात्रोत्सवात बंगाली बांधवांकडून दुर्गादेवी पूजेचे आयोजन केले जाते़ महाशष्टी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी व महादशमी असे प्रतिदिन दुर्गादेवीची रोज आरती व पूजा, पुष्पांजली, संध्याआरती, दधीकर्मा, दर्पण विसर्जन असे कार्यक्रम होणार आहेत़ या उत्सवासाठी बंगा संजोगचे फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण मुखर्जी, उपाध्यक्ष बरुन पाल, आयोजक कमिटीचे अध्यक्ष समर बॅनर्जी, पॅरोन इन चिफ एच़ एस़ बॅनर्जी, गौतम नाग, ए़ के.साहा, बी़ आऱ घोष, प्रसांता भट्टाचार्यजी, शेखर दत्ता, अमिताभ चक्रवर्ती, सुसलव विश्वास, अनिमेश मुखर्जी, शांतनुरे शिला घोष प्रयत्नशील असून प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक हेमलता पाटील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे़