डंपरला कारची धडक; बापलेकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 23, 2014 00:26 IST2014-07-22T23:33:39+5:302014-07-23T00:26:48+5:30
उड्डाणपुलावरील घटना : कसबे सुकेणे गावावर शोककळा

डंपरला कारची धडक; बापलेकाचा मृत्यू
नाशिक : उभ्या असलेल्या मुरमाच्या डंपरला अॅसेंट कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपाारी आडगाव नाक्यावरील उड्डाणपुलावर घडली़ या अपघातात कसबे सुकेणे येथील सिकंदर तांबोळी व त्यांचा मुलगा साहिल तांबोळी (१२) या बापलेकाचा मृत्यू झाला तर याच कुटुंबातील अन्य तीन जण गंभीर जखमी झालेत.त्यांचावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफ ाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील सिकंदर मुनीर तांबोळी (३५), त्यांची पत्नी रेश्मा सिकंदर तांबोळी (३२), मुलगा साहिल सिकंदर तांबोळी (१२), मुलगी कशिश सिकंदर तांबोळी (१०), मुलगा आलियान सिकंदर तांबोळी हे मुंबईहून नाशिककडे अॅसेंट कारने (एमएच १७, के - १५८४) येत होते़ मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण पोलीस चौकीजवळील उड्डाणपुलावरून जात असताना या कारने डंपरला (एमएच १५, सीके ८००८) जोरदार धडक दिली़ डंपरला पाठीमागून दिलेल्या
जोरदार धडकेमुळे तांबोळी यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर
झाला़
कारमध्ये पुढे बसलेला साहिल सिकंदर तांबोळी (१२) हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ जखमी रेश्मा तांबोळी, कशिश तांबोळी, आलियान तांबोळी यांच्यावर श्रीजी तसेच साई सेवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़