संकीर्तनात डुंबले भक्तगण
By Admin | Updated: January 23, 2017 00:08 IST2017-01-23T00:08:32+5:302017-01-23T00:08:51+5:30
येवला : संगीतमय सुंदरकांड पाठ

संकीर्तनात डुंबले भक्तगण
येवला : येवला शहरात संगीतमय सुंदरकांड पाठ आणि संकीर्तनाचा कार्यक्रम शेकडो भाविकांच्या उपस्थिती झाला.
श्री श्री १०८ महंत महादेवानंद सरस्वती व स्वामी सचदेवानंद सरस्वती आणि त्यांना साथ देणारे सुप्रसिद्ध गायक हरिओम मुंजाल, सुरेंद्र अंगरस यांच्या सुरेल आवाजाने भक्तगण मंत्रमुग्ध झाले. स्वामी सचदेवानंद सरस्वती श्री नारायण सेवा ट्रस्ट नागडे ता. येवला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रमुख अतिथी श्यामसुंदर काबरा आणि कांचन काबरा होते. यावेळी मधु गुप्ता , राजेंद्र वडे, सुरेश कुंभारे, संतोष देसाई, विनोद बाकळे, नितीन गंगापूरकर, संतोष भरते, अतुल राठी, प्रवीण पहिलवान, राजेंद्र बाकळे, श्रीकांत बाकळे, कुंदन झोंड, संजीव सोनवणे, संजय विधाते आदि उपस्थित होते. (वार्ताहर)