मोसम खोऱ्यातील गावांमध्ये भरपावसाळ्यात पाणीटंचाई
By Admin | Updated: July 31, 2015 23:02 IST2015-07-31T23:02:44+5:302015-07-31T23:02:44+5:30
मोसम खोऱ्यातील गावांमध्ये भरपावसाळ्यात पाणीटंचाई

मोसम खोऱ्यातील गावांमध्ये भरपावसाळ्यात पाणीटंचाई
ब्राह्मणपाडे : मोसम खोऱ्यासह परिसरातील गावांमध्ये भरपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, हरणबारी धरणातील जलसाठाही कमी झाला आहे.धरणात पाणी कमी असल्याने मोसम नदीला पाणी सोडता येणार नाही. काही गावातील हातपंपांना सध्या भरपूर पाणी आहे पण त्यांचे हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत. त्यामुळे भरपावसाळ्यात लोकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लाभत आहेत.
नामपूर शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाचे दोन महिने निघून गेले मात्र मुसळधार पाऊस झालेला नाही. नदीनाल्यांना पूर गेलेला नाही. संबंधितांंनी मोसमखोऱ्यातील नादुरुस्त हातपंप त्वरित दुरूस्त करावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत
आहे. (वार्ताहर)