शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत  देवनदीतील बंधाऱ्यांची दुुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:10 IST

बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले.

सिन्नर : बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर झालेल्या वडांगळी व खडांगळीच्या मध्यावर देवनदीतील देवना व कासारनाला येथील बंधारे दुुरस्ती, गाळ उपसा, वडांगळी येथील विविध विकासकामे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.व्यास पीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुदेश खुळे, सरपंच सुनीता सैद, उपसरपंच किशोर खुळे, बाजार समितीचे संचालक शांताराम कोकाटे, खडांगळीचे उपसरपंच केशव कोकाटे, विजय कुलथे, सलीम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.  शहीद संदीप ठोक अभ्यासिका, जलशुद्धिकरण, आरोग्य उपकेंद्र कम्पाउंड, दशक्रिया विधी ठिकाणी किचन शेड, चर्मकार गल्लीत भूमिगत गटार, शाळेकडे जाणारा फुटपाथ रोड, १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ अशा सर्व सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक कामांची भूमिपूजने व वाहनतळ, अल्पसंख्याक वस्तीत सीमेंट कॉँक्रीट रस्ता, बाजारतळ सुधारणा आदी सुमारे ६० लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.बंधायामुळे होणार वडांगळीसह चार गावांना फायदादेवना बंधाºयाची पडझड झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे बंधाºयाची दुुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याची बाब या भागातील शेतकरी व विकास सोसायटीचे संचालक बापूसाहेब खुळे, उत्तम खुळे यांच्यासह खडांगळी येथील शेतकºयांनी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या लक्षात आणून दिली. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या गटातील गावेही या बंधाºयाची लाभार्थी गावे असल्याने त्यांनी या कामासह कासार नाल्यावरील बंधारे दुरु स्ती व गाळ उपशा साठी पाठपुरावा केला. मंजूर झालेल्या या कामामुळे वडांगळीसह खडांगळी, मेंढी व चोंढी येथील भूजल पातळी वाढून शेतकºयांना फायदा होणार आहे.

टॅग्स :riverनदीDamधरण