नाशिक लगत भुकंपाचे धक्के बसल्याने घबराहट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:38 PM2017-12-25T15:38:01+5:302017-12-25T15:39:46+5:30

सकाळी ९ वाजुन ४४ मिनीटे ३१ सेकंदाच्या दरम्यान, जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून,

Due to the tremors caused by the Nashik project, there was panic | नाशिक लगत भुकंपाचे धक्के बसल्याने घबराहट

नाशिक लगत भुकंपाचे धक्के बसल्याने घबराहट

Next
ठळक मुद्दे४० किलो मीटरचा परिघ : सुदैवाने नुकसान नाहीरिस्टल स्केलवर भुकंपाची तीव्रता ३.२ इतकी

नाशिक : कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपुर्वी बसलेल्या भुकंपाच्या धक्क्याने भितीचे सावट कायम असताना सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलो मीटरच्या परिघात एका पाठोपाठ तीन भुकंपाचे धक्के बसले आहेत. भुकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जवळच हे धक्के जाणवल्याने शहरवासियांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. रिस्टल स्केलवर भुकंपाची तीव्रता ३.२ इतकी असल्याने त्याची नोंद मेरीच्या केंद्रावर झाली आहे.
सकाळी ९ वाजुन ४४ मिनीटे ३१ सेकंदाच्या दरम्यान, जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, साधारणत: पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात त्याचा केंद्रबिंदु असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणत: ३.२ रिस्टल स्केलची तीव्रता या धक्क्यांची असल्याने जमीनीला हादरे बसल्याचे तसेच भिंती व दरवाजे, खिडक्यांचे तावदाने हलल्याचे सांगण्यात आले. साधारणत: तीन मिनीटांच्या कालावधीत जमीन हादरली. त्यानंतरही काही कालावधीनंतर दोन धक्के बसले आहेत. त्याची तीव्रता मात्र १.३ व १.६ रिस्टल स्केल इतकी आहे. त्यामुळे फारसे काही जाणवले नाही. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका भुकंपप्रवण म्हणून नोंदविला गेला असून, याठिकाणी अधुन मधून भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे. या भागात नेहमीच बसणाºया भुकंपाच्या धक्क्यामागील कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून, त्यासाठी दिल्ली व हैद्राबादच्या भुगर्भशास्त्रज्ञांना देखील पाचारण करण्यात आले आहे, परंतु त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. आता नाशिक शहरापासून अवघ्या ४० किलो मीटर परिसरापर्यंत धक्के जाणवल्याने नाशिककरांच्या पोटात भितीचा गोळा उठणे साहजिकच असले तरी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यांचे ठिकाण शोधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

Web Title: Due to the tremors caused by the Nashik project, there was panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.