शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

कांदा भावात घसरण झाल्याने  संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावी बंद पाडले लिलाव 

By प्रसाद गो.जोशी | Updated: January 29, 2024 15:11 IST

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हटवावी तसेच विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली

लासलगाव (शेखर देसाई) :- कांद्याचे बाजारभाव  ८०० ते९०० रुपयांपर्यंत खाली आल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना  आक्रमक झाली. त्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दीड तास कांद्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हटवावी तसेच विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरु झाले. यावेळी कांद्याचे दर एक हजार रुपयांच्या वर जात नसल्याने भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव पुकारणे बंद केले   अचानक कांद्याचे लिलाव बंद पडल्याने यावेळी बाजार समिती प्रशासन व पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बाजार समिती प्रशासन व पोलिसांच्या विनंती नंतर बाजार समितीच्या आवारात ठिय्या मांडून बसलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्याने बंद पडलेले कांद्याचे लिलाव दीड तासानंतर पुन्हा सुरु केले.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारFarmerशेतकरी