भाजीविक्रे ते व मनपा प्रशासनात संघर्ष होण्याची दाट
By Admin | Updated: August 23, 2016 00:42 IST2016-08-23T00:42:36+5:302016-08-23T00:42:50+5:30
प्रश्न : सव्वा वर्षानंतर गंगाघाटावर भरला भाजीबाजार

भाजीविक्रे ते व मनपा प्रशासनात संघर्ष होण्याची दाट
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत गोदावरी नदीकाठालगत भरणारा भाजीबाजार तब्बल सव्वा वर्षानंतर पुन्हा सुरू झाला आहे. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सदर भाजीबाजाराची जागा खाली करण्यात आली होती. कुंभमेळा सांगता होताच शेकडो भाजीविक्रेत्यांनी पुन्हा पूर्वीच्याच जागेवर भाजीबाजार थाटून एकप्रकारे महापालिकेला आव्हान दिले आहे.
सोमवारच्या दिवशी गंगाघाटावर भरलेला भाजीबाजार बघून ग्राहकही अचंबित झाले. पूर्वीप्रमाणेच भाजीविक्रे त्यांनी बस्तान मांडल्याने ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी भाजी विक्रे त्यांकडे जात असल्याचे दिसून आले. गंगाघाटावर जवळपास सातशे भाजीविक्रे ते असून सिंहस्थ कालावधीत या भाजीबाजाराची जागा खाली करण्यात आली होती.
रविवारी सकाळी भाजीविक्रे त्यांनी पूर्वीच्याच जागेवर भाजीबाजार थाटला होता. भाजीविक्रे त्यांनी पुन्हा भाजीबाजारात बस्तान मांडल्याची कुणकुण मनपा प्रशासनाला लागली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी अतिक्र मण विभागाच्या पथकाने पाहणी केली खरी; मात्र पोलीस बळ अपुरे असल्याने पथकाला आल्या पावली माघारी फिरावे लागले. भाजीविक्रे त्यांना गणेशवाडीत भाजीमंडई उभारली असली तरी ती पूररेषेत असल्याने तसेच त्याठिकाणी ग्राहक येणार नाही, असे कारण पुढे करून विक्रे त्यांनी भाजीमंडईला विरोध करून आयुर्वेद महाविद्यालयाजवळ असलेल्या जागेची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. दोन दिवसांपासून भाजीविक्रे त्यांनी पुन्हा एकदा पूर्वीच्याच जागेवर भाजीबाजार थाटल्याने प्रशासनाकडून कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने कारवाई सुरू केल्यास महापालिकेपुढे भाजीविक्रेत्यांचे आव्हानान यांच्यात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर )