राजूर बहुला या गावात भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: May 6, 2015 01:48 IST2015-05-06T01:46:59+5:302015-05-06T01:48:05+5:30
राजूर बहुला या गावात भीषण पाणीटंचाई

राजूर बहुला या गावात भीषण पाणीटंचाई
सिडको : राजूर बहुला या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून पाण्याची मागणी केली. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषत: उन्हाळ्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पाणीपुरवठा योजना बारगळली असून, कोणताही निर्णय होत नसल्याने पाण्याअभावी हाल होत आहेत. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून पाणीपुरवठ्याची मागणी केली. आंदोलनात भीमा पेंढारकर, भानूबाई जाधव, सीमा जाधव, सुमन चिंधे, सिंधू चौधरी, पमाबाई धुमाळ, सविता जाधव, सत्यभामा चौधरी, आदिंसह महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)