सर्व्हर डाउनमुळे शेतमाल विक्रीची नोंदणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:37 IST2018-10-05T00:34:01+5:302018-10-05T00:37:40+5:30
येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमाल विक्र ी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे अद्ययावत सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकºयांना नावनोंदणीसाठी अडचण निर्माण होत आहे.नोंदणीची मुदत कमी असल्याने शेतकºयांना उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड व संचालकानी केली आहे.

सर्व्हर डाउनमुळे शेतमाल विक्रीची नोंदणी रखडली
येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमाल विक्र ी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे अद्ययावत सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकºयांना नावनोंदणीसाठी अडचण निर्माण होत आहे.नोंदणीची मुदत कमी असल्याने शेतकºयांना उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड व संचालकानी केली आहे.
शासनाच्या आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत मूग,उडीद व सोयाबीन विक्र ीसाठी येथील तालुका खरेदी विक्र ी संघात केंद्र आहे. शेतमाल विक्र ीसाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून त्यासाठी सातबारा उतारा गरजेचा आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने शेतकºयांना आॅनलाईन उतारा मिळत नाही. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. मुग व उडीदाची आॅनलाईन नोंदणीची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंतच असल्याने शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी या समस्येवर पर्याय शोधावा व उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड, संचालक भागुनाथ उशीर, दत्ता आहेर, राजेंद्र गायकवाड,भास्कर येवले, दत्तात्रेय वैद्य, सुरेश कदम, व्यवस्थापक बाबासाहेब जाधव आदींनी केली आहे.आर्थिक फटक्याची भीतीमुदतीत आॅनलाइन खरेदीसाठी नोंदणी न झाल्यास शेतकºयांना शासकीय आधारभूत किमतीचा लाभ मिळणार नसून मोठा आर्थिक फटका बसण्याचीही भीती आहे. एकतर दुष्काळाची स्थिती असल्याने पाणीटंचाईतही पिकवलेले पीक कवडीमोल दराने विक्र ीचे संकट ओढवले जाऊ शकते. नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याने शेतकरी वंचित राहू नये व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सातबारे उतारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी सचालक मडळाने केली आहे.