शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरला चारा टंचाईने पशुपालक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:45 IST

शासनाचे दुर्लक्ष : चाराछावणीला अद्याप मुहूर्त नाही

ठळक मुद्देपशूपालकाकडे काही प्रमाणात बाहेरगावाहून आणलेला चारा संपून गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर हे गाव दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असतानाही याठिकाणी शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून जनावरांसाठी चारा संपुष्टात आल्याने चारा टंचाईमुळे पशुपालक हैराण झाले आहेत.राजापूर व परिसरात जनावरांचा चारा, पिण्यासाठी पाणी यांची टंचाई अधिक तीव्र होत चालली आहे. शासनाने अद्याप जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केलेल्या नाहीत. पशूपालकाकडे काही प्रमाणात बाहेरगावाहून आणलेला चारा संपून गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मृग नक्षत्र लागून पाच ते सहा दिवस होऊनही पावसाचे आगमन होत नसल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. येवला तालुक्यातील पूर्वकडील भागात मागील वर्षी खरीप पुर्णपणे वाया गेला असल्याने येथील चारा टंचाई निर्माण झाली आहे. मध्यंतरी चारा विकत आणून कसेबसे दिवस काढले. पण आता चारा विकत घेण्यासाठी पशूपालकांकडे पैसेही नाहीत. शेतकरी वर्ग पुरता डबघाईस आलेला आहे . राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथे दरवर्षी दुष्काळाची धग जाणवते. जनावरांना चारा नसल्यामुळे जनावरांनी खाऊन फेकलेली डाखळं सुध्दा आता जनावरं खात आहेत. प्रामुख्याने तालुूक्यातील पूर्व भागात सध्या चारा टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे . परिसरातील विहीरींनीही तळ गाठला आहे. राजापूर येथील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती आहे. याठिकाणी टॅकरच्या खेपा वाढून मिळाव्यात आणि जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी पशुपालक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ