योग्य जीवनशैलीमुळे आजार नियंत्रणात : पत्की
By Admin | Updated: March 18, 2016 23:57 IST2016-03-18T23:50:25+5:302016-03-18T23:57:03+5:30
योग्य जीवनशैलीमुळे आजार नियंत्रणात : पत्की

योग्य जीवनशैलीमुळे आजार नियंत्रणात : पत्की
नाशिक : योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक ताणतणावांना दूर ठेवून, योग्य जीवनशैलीने दिनचर्या ठेवली तर सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या आजारांना सहजतेने दूर ठेवता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ संगीता पत्की यांनी केले. हुतात्मा स्मारक येथे समाज परिवर्तन केंद्राच्या वतीने आयोजित केशव भारती स्मृती व्याख्यानाअंतर्गत ‘आहार व शरीरस्वास्थ’ या विषयावर त्या बोलत होत्या.
पत्की पुढे म्हणाल्या की, ताणतणावांना आपल्या आयुष्यात किती आणि कसे महत्त्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. आजारांमध्ये त्याची परिणती व्हायला नको याची खबरदारी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीतील चौरस आहाराचे महत्त्व अधोरेखित करताना पत्की म्हणाल्या की, शरीराला आपले कार्य करण्यासाठी ज्या घटकांची गरज असते ते सारे चौरस आहाराच्या परिपाकातूनच मिळतात. यावेळी बापू उपाध्ये स्मृती जलजागृती निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास गोविंद माळी, सुधा माळी, वसंतराव हुदलीकर, कुमार औरंगाबादकर, सुधा माळी, सुषमा देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. अभिजीत रणधीर याने प्रथम क्रमांक मिळवला. अक्षदा भंडारे याने द्वितीय, तर अनुराधा तावरे तृतीय आली. रेणुका जाधव, सुनीता शिंदे, भूषण रिपोटे, अर्जुन बेजेकर, दीपक शहाणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.