शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

हद्दीच्या वादामुळे घोडकीचा घाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:37 PM

पेठ : नाशिक व पेठ या दोन तालुक्यांना जोडणारा व सर्वात जवळचा समजला जाणारा रस्ता घोडकीच्या घाटातून जात असून, दोन्ही तालुक्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादामुळे निम्म्या घाटात अवघड वळणावर रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत असून, आगामी पावसाळ्यात केवळ १ किमी खराब रस्त्यामुळे प्रवाशांना ३० किमी फेरा घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुरवस्था : एक किमीसाठी तीस किमीचा फेरा

पेठ : नाशिक व पेठ या दोन तालुक्यांना जोडणारा व सर्वात जवळचा समजला जाणारा रस्ता घोडकीच्या घाटातून जात असून, दोन्ही तालुक्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादामुळे निम्म्या घाटात अवघड वळणावर रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत असून, आगामी पावसाळ्यात केवळ १ किमी खराब रस्त्यामुळे प्रवाशांना ३० किमी फेरा घेऊन प्रवास करावा लागणार आहे.पेठ तालुक्याचा विस्तार दक्षिण उत्तर असा असून, नाशिक-पेठ व नाशिक-हरसूल हे दोन मुख्य मार्ग आहेत. काही वर्षांपूर्वी कुळवंडी दोनवडे मार्ग थेट देवरगाव गिरणारेकडे जाणारा नवा रस्ता बनविण्यात आला. दोनवडे नजीक मोठ्या टेकडीला वळसा घालून घाटाचे काम पूर्ण होऊन रस्ता सुरू करण्यात आला. नाशिक व पेठ तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या हद्दीत डांबरीकरण करून काम उरकते घेतले; मात्र ऐन घाटात हद्दीच्या वादामुळे एक किमी रस्ता तसाच राहिला, त्यामुळे प्रवाशांना अक्षरश: दगडातून मार्गक्रमण करावे लागत आहे. वाहनधारकांना पायी प्रवास करावा लागत आहे. पेठ तालुक्यातील कुळवंडी, घनशेत, दोनवडे, मानकापूर, शेवखंडी, आमलोण, पिंपळवटी, पाटेपासून गावांना नाशिकला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने जीवघेणी कसरत करून नागरिकांना प्रवास करावा लागतो. पावसापूर्वी या रस्त्याची किमान दुरुस्ती तरी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.वर्गणी काढून रस्तादुरु स्तीपेठ तालुक्यातून नाशिकला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने नाशिक शहरातून पेठ तालुक्यात नियमित प्रवास करणारे प्रवासी, अधिकारी व कर्मचारी यांना पावसाळ्यात वैयक्तिक वर्गणी करून जेसीबीच्या साह्याने रस्त्याची दुरु स्ती करून घ्यावी लागते, तर बहुतांश वाहनधारक प्रवाशांना उतरून रिकामे वाहन कसरत करून या मार्गावरून काढताना दिसून येतात.