शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ओखी वादळाचा नाशिकच्या द्राक्ष बागांनाही फटका, रिमझीम पाऊस, ढगाळ वातावणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:57 IST

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

ठळक मुद्दे द्राक्षबागांना पावसापासून वातावरणापासून धोका द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने चिंतेत भर

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला तडाखा देणाऱ्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.घड काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्षबागांना या पावसापासून आणि ढगाळ वातावरणापासून सर्वाधिक धोका आहे. या द्राक्षांमध्ये साखरभरणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याने प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.तर फुलोऱ्यात असलेल्या बागांना वाचविण्याचासीठ प्रतिबंधात्मक फवारण्यांसह डावण्यापासून वाचविण्यासाठीही फवारणी करावी लागणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु, कर्ज काढून लागवड व देखभाल केल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार असून त्यासाठी खर्चातही मोठय़ा प्रमाणात भर पडणार असल्याने शहर परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकरी चिताग्रस्त झाला आहे. द्राक्षाचे पीक मात्र वर्षातून एकदाच घेतले जाते शिवाय पीक उभे करण्यासाठी एकरी किमान चार लाख रु पये खर्च येतो तेव्हा बाग उभी राहते शिवाय चालू फळ धारणोपासून एकरी अडीच ते तीन लाख खर्च येतो त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पीक विक्रीसाठी बाजारात येते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष पीक अंतिम टप्प्यात असून छाटणीनंतर तीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यामुळे बागेची मशागत व देखभालीची सर्व कामे आटोपली आहे. पीक तयार होण्याच्या अवस्थेत असून महागाडी खते, औषधे फवारणी करून झाली आहे. मजुरांचीही सर्व कामे आटोपली आहे आता केवळ पीक परिपक्व होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी असतांना नैसिर्गक आपत्तीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला असून लाखो रु पये खर्च करून द्राक्ष पिकाचा तोंडी आलेला घास हिरावला जातोय की काय, अशी भीती शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस