शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

लाइटबील न भरल्याने नाशिकच्या इनडोअर स्टेडीयमचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 15:38 IST

नाशिक- अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडीत करण्यात आला आहे. यामुळे वीज पुरवठ्यावर सुरु असलेले सेतू कार्यालय तसेच मैदानातील म्यूझिकवर सुरु राहणारे संगीत बंद झाले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या गोष्टीला तब्बल आठ दिवस उलटुनही ढिसाळ व नियोजनशून्य कारभार असलेल्या ...

नाशिक- अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडीत करण्यात आला आहे. यामुळे वीज पुरवठ्यावर सुरु असलेले सेतू कार्यालय तसेच मैदानातील म्यूझिकवर सुरु राहणारे संगीत बंद झाले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या गोष्टीला तब्बल आठ दिवस उलटुनही ढिसाळ व नियोजनशून्य कारभार असलेल्या मनपाकडून दखल घेतली जात नसल्याने क्रीडा प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.अश्विननगर येथील राजे संभाजी इनडोअर स्टेडीयमची संपूर्ण वाताहत झाली असून, सर्वत्र घाण, माती साचलेली, अस्वछता, शौचालयाची दुरवस्था झालेली असतांनाच गेल्या आठ दिवसांपासून लाइटबील न भरल्याने महावितरण कंपनीच्या वतीने इनडोअर स्टेडीयमचा वीज वीजप्रवाह खंडित केला आहे. संपूर्ण इनडोअर स्टेडिअममध्ये धूळ व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्योन याबाबत नुकतीच क्रंीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविला. शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून राजे संभाजी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या इनडोअर स्टेंडीयममध्ये खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा करणे अपेक्षीत होते,परंतू निधी उपलब्ध नसल्याचे कारण मनपाकडून सांगण्यात येत आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने इनडोअर गेम खेळण्यासाठी सकाळपासून क्रीडाप्रेमींची गर्दी होते. मैदानालगतच उभारण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकवरही नागरिक सकाळ व सायंकाळ फिरण्यासाठी येतात. याठिकाणी मनपाने बास्केटबॉल, बॅटमिंटन, व्हॉलीबॉल व अंतर्गत खेळ खेळण्यासाठी इनडोअर स्टेडिअम उभारले आहे. परंतू आजही याठिकाणी एका खाजगी शाळेच्या कार्यक्रमासाठी हे इनडोअर स्टेडीयम भाड्याने दिले असल्याचे दिसून आले आहे. परंतु या इनडोअर स्टेडिअममध्ये इनडोअर खेळ होणे अपेक्षित असताना मनपा मात्र हे इनडोअर स्टेडिअम खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देत असल्याने क्रिडापे्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे.