वीजपुरवठ्याअभावी शेतातील कामे खोळंबली
By Admin | Updated: March 3, 2017 00:51 IST2017-03-03T00:51:38+5:302017-03-03T00:51:47+5:30
देवळा : परिसरातील शेतातील कामे विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने खोळंबली असल्याने येथील ग्रामस्थांचे नुकसान होत आहे.

वीजपुरवठ्याअभावी शेतातील कामे खोळंबली
देवळा : तालुक्यात मुबलक पाणीपुरवठा उपलब्धदेवळा : परिसरातील शेतातील कामे विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने खोळंबली असल्याने येथील ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. याबाबतdevala विद्युत कंपनीला निवदेन देण्यात आले आहे.
वीज वितरण कंपनीने रोहित्रांची त्वरित दुरुस्ती करावी, अखंडित व उच्चदाबाने वीजपुरवठा सुरू करावा, यासंदर्भात देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील अहेर यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले आहे.
चालूवर्षी सर्वत्र उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. तरी वीजकंपनीने अखंडित व उच्चदाबाने वीजपुरवठा सुरू करावा, नादुरु स्त रोहित्रांची त्वरित दुरुस्ती करून नवीन बसविलेल्या रोहित्रांना वीजपुरवठा सुरू करावा अन्यथा वीजकंपनीच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ६) देवळा येथील पाचकंदील परिसरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.निवेदनावर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, ललित निकम, राजेश अहेर, पप्पू हिरे, दशरथ पूरकर, समाधान अहेर, नानाजी पवार, माणिक शिंदे, कारभारी शिंदे, दीपक गांगुर्डे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)