वाहनाच्या धडकेने एक जागीच ठार
By Admin | Updated: October 12, 2015 23:26 IST2015-10-12T23:09:42+5:302015-10-12T23:26:23+5:30
वाहनाच्या धडकेने एक जागीच ठार

वाहनाच्या धडकेने एक जागीच ठार
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई आग्रा महामार्गावर
सोमवारी दुपारी बारा वाजेच्या
सुमारास इगतपुरी शहरा जवळील लंगड्याची वाडी येथे मुंबईकडे
भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पायी चालणाऱ्या प्रकाश नवसू मेंगाळ (४०), राहणार लंगड्याचीवाडी याला
धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी इसमाला वाहनाने धडक दिल्यानंतर वाहन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला
असून पोलीस अज्ञात वाहनाचा
शोध घेत आहेत. (वार्ताहर)