पॅकेजिंगच्या नव्या नियमांमुळे शहरातील व्यापारी संतप्त

By Admin | Updated: July 10, 2014 01:27 IST2014-07-10T01:27:20+5:302014-07-10T01:27:29+5:30

पॅकेजिंगच्या नव्या नियमांमुळे शहरातील व्यापारी संतप्त

Due to the new rules of packaging, businessmen in the city are angry | पॅकेजिंगच्या नव्या नियमांमुळे शहरातील व्यापारी संतप्त

पॅकेजिंगच्या नव्या नियमांमुळे शहरातील व्यापारी संतप्त

 

नाशिक : तेल वितरकांना पॅकिंग आणि लेबलिंगसंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले असून, त्याअंतर्गत पंधरा दिवसांच्या आत प्रयोगशाळा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तेल व्यापारी संतप्त झाले असून, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या रविवारी उत्तर महाराष्ट्रातील तेल व्यापाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सी. बी. पवार यांनी येथे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. यात खाद्यतेल पॅकिंग आणि लेबलिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांना पंधरा दिवसांत तेलाचा दर्जा तपासणारी प्रयोग शाळा तयार करण्यास सांगितले आहे. सदरचे काम खर्चिक असून व्यापाऱ्यांना किमान सहा लाख रूपयांचा खर्च येणार आहे. वास्तविक, संबंधित व्यावसायिकांना तेलाचा दर्जा प्रमाणित आहे काय, हे तपासण्यासाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागते. तशी व्यवस्था असतानाही प्रत्येकाला सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा आणि राजन दलवाणी यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तेल वितरक किंवा लेबलिंग करणारे हे तेलावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करीत नाही किंवा ते उत्पादक नाहीत. त्यामुळे त्यांना ही सक्ती करता येऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात येत्या रविवारी उत्तर महाराष्ट्रातील तेल व्यापाऱ्यांची नाशिक्लब येथे बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the new rules of packaging, businessmen in the city are angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.