मालेगाव आचारसंहितेमुळे लोकशाहीदिन नाही
By Admin | Updated: October 3, 2014 01:13 IST2014-10-03T01:12:52+5:302014-10-03T01:13:17+5:30
मालेगाव आचारसंहितेमुळे लोकशाहीदिन नाही

मालेगाव आचारसंहितेमुळे लोकशाहीदिन नाही
मालेगाव : येथील महानगरपालिकेतर्फे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन या महिन्यात होणार नाही, अशी माहिती मनपा आयुक्त अजित जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आलेली आहे. तसेच येत्या सोमवारी शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे या महिन्यात लोकशाही दिन होणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.