ठेकेदारांच्या पत्रांमुळे महापालिका बुचकळ्यात
By Admin | Updated: March 6, 2015 00:42 IST2015-03-06T00:40:42+5:302015-03-06T00:42:21+5:30
ठेकेदारांच्या पत्रांमुळे महापालिका बुचकळ्यात

ठेकेदारांच्या पत्रांमुळे महापालिका बुचकळ्यात
नाशिक : एलईडी पथदीप खासगीकरणातून बसविण्याचा ठेका दिल्यानंतर ठेकेदार काम करीत नाही म्हणून दुरुस्ती देखभालीसाठी तीन कोटी रुपयांची निविदा मागविणाऱ्या महापालिकेने ठेकेदाराने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकाच आता देखभाल दुरुस्ती करणार आहे काय असा प्रश्न ठेकेदाराने केला असून, त्यामुळे त्याला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने शहरातील सर्व पथदीप एलईडीचे बसविण्यासंदर्भात हैदराबाद येथील कंपनीस काम दिले आहे, परंतु सदर कंपनी काम करीत नसल्याने हे काम रखडले आहे. दरम्यान, देखभाल दुरुस्ती होत नसल्याने नगरसेवकांनी तक्रारी केल्या तसेच राज ठाकरे यांनी आयुक्तांना ठेका रद्द करण्यासाठी पडताळणी करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने महापालिकेने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली. त्याचबरोबर नादुरुस्त पथदीप दुरुस्त करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाची निविदा मागविली. परंतु त्यामुळे ठेकेदाराने महापालिकेला आता देखभाल दुरुस्तीचे काम प्रशासनच करणार आहे काय, असा प्रश्न केला आहे.