धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने प्रवासी जखमी

By Admin | Updated: October 9, 2016 01:53 IST2016-10-09T01:52:37+5:302016-10-09T01:53:11+5:30

धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने प्रवासी जखमी

Due to a jump from the running train, the passengers were injured | धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने प्रवासी जखमी

धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने प्रवासी जखमी

नाशिकरोड : औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये चुकून बसलेल्या प्रवाशाने देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने तो गंभीर जखमी होऊन मयत झाला.
मध्य प्रदेश येथील दिंडोरी जिल्ह्यातील पंचगाव रयत येथील पुनू रोनू धुर्वे (४५) व त्यांचा पुतण्या यांना जबलपूर येथे जायचे असल्याने ते शुक्रवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आले होते. यावेळी औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये दोघे काका-पुतण्या बसल्यानंतर त्यांना आपण चुकीच्या गाडीत बसले असल्याचे लक्षात आले. नाशिकरोडनंतर देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकावर तपोवन एक्स्प्रेस धिम्या गतीने जात असताना पुनू धुर्वे याने धावत्या गाडीच्या विरुद्ध दिशेने उडी मारल्याने तो प्लॅटफॉर्मवर पडून गंभीर जखमी झाला. प्रवासी पुनू धुर्वे याच्यावर छावणी परिषदेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास त्याचे निधन झाले. (प्रतिनिधी)
४नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

Web Title: Due to a jump from the running train, the passengers were injured