अपुऱ्या साठ्यामुळे दिंडोरीतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:23+5:302021-08-13T04:18:23+5:30
लसीकरणाचा उडाला बोजवारा दिंडोरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रमाचा अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे बोजवारा उडाल्याचे चित्र दिंडोरी तालुक्यातील पहावयास ...

अपुऱ्या साठ्यामुळे दिंडोरीतील
लसीकरणाचा उडाला बोजवारा
दिंडोरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रमाचा अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे बोजवारा उडाल्याचे चित्र दिंडोरी तालुक्यातील पहावयास मिळत आहे.
तालुक्यात दहा आरोग्य केंद्र व दिंडोरी वणी ग्रामीण रुग्णालयात पुरेश्या लस पुरवठा होत नसल्याने अनेक आरोग्य केंद्राच्या बाहेर लसीकरण बंद असल्याचे बोर्ड झळकले आहेत. तालुक्याला यापूर्वी तीन हजारांच्यावर लसींचा पुरवठा होत होता, परंतु गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून एक हजारापेक्षा कमी लस पुरवठा होत असल्याने अनेक गावांचे लसीकरण रखडले आहे.
१८ ते ४४ तसेच ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांना पहिली लस घेऊन १०० दिवसांच्यावर दिवस होऊनदेखील आरोग्य विभागाकडून पुढील डोसबाबत नियोजन केली जात नसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत आहे.
लसीकरणासाठी नागरिक पहाटेच आरोग्य केंद्रावर येत आहे, मात्र लस नसल्याने त्यांना माघारी जावे लागत आहे, तर ज्या केंद्रावर लसीकरण राहत आहे, तेथेही अपुरे डोस उपलब्ध होत असल्याने अनेकांना लस अभावी परतावे लागत आहे. ज्या गावात आरोग्य केंद्र उपकेंद्र नाही तेथील परिस्थिती अधिक बिकट असून, अनेक नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहे.
अनेक आरोग्य केंद्रात फक्त आठवड्यातून एक ते दोन दिवसच लसीकरण होत असल्याची माहिती ग्रामस्थांमार्फत मिळत आहे. जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना दिंडोरी तालुक्यातील लसीकरणाचा उडालेला बोजवारा नागरिकांच्या चिंतेत भर वाढवणारा ठरत आहे.