कांदा आवक वाढल्याने बाजारभावात झाली तेजी

By Admin | Updated: June 30, 2014 01:12 IST2014-06-30T01:05:15+5:302014-06-30T01:12:46+5:30

कांदा आवक वाढल्याने बाजारभावात झाली तेजी

Due to the increase of onion inward trend, | कांदा आवक वाढल्याने बाजारभावात झाली तेजी

कांदा आवक वाढल्याने बाजारभावात झाली तेजी



येवला : येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर कांदा आवक वाढली असून, बाजारभावात तेजी झाल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसले. कांद्याला देशांतर्गत व बाहेरही मागणी वाढली आहे.
गेल्या सप्ताहात येवला मार्केटला २३३३१ क्विंटल गावरान कांद्याची आवक होऊन बाजारभाव ५०० ते २३००रु. तर सरासरी १९०० रु. प्रतिक्विंटल होते. अंदरसूल उपबाजारात १९७१३ क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजारभाव ५०० ते २५०० रु. तर सरासरी १८०० रुपयेपर्यंत होते.
भुसार मालामध्ये बाजरी व तुरीची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहेत. गेल्या सप्ताहात बाजरीची आवक केवळ २० क्विंटल झाली बाजारभाव किमान १२५० रु. ते कमाल १४८५ रु. तर सरासरी रु. १३५८ प्रतिक्विंटल होते. तुरीची आवक केवळ ८ क्विंटल व बाजारभाव किमान ३२५१ रु. ते कमाल ३३५८ तर सरासरी ३३०० रु.पर्यंत होते.
गव्हाची आवक ५८ क्विंटल झाली बाजारभाव किमान रु. १४१४ ते कमाल रु. १८०३ तर सरासरी १५७२ रु. पर्यंत होते. हरभरा आवक २४ क्विंटल बाजारभाव रु. १९०० ते कमाल २४२५ रु. तर सरासरी २०३२ रु. प्रतिक्विंटल होते.
मक्याला मागणी वाढल्याने, आवकेत जरी घट झाली तरी ७९ क्विंटल मक्याची आवक झाली. बाजारभाव रु. ११४० ते कमाल रु. १३४४ तर सरासरी १२९१ रु. होते.

Web Title: Due to the increase of onion inward trend,